27 April 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये
x

मग होऊ दे JPC'; 'शिवसेनेलासुद्धा मोदी सरकारवर संशय

नवी दिल्ली : राफेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात काँग्रेसने मोठा गदारोळ केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसल्याचं खासदार सावंत यांनी म्हटलं आणि अप्रत्यक्षरित्या भाजप व मोदी सरकारवरच संशय व्यक्त केला.

संसद सभागृहात यूपीएच्या काळात झालेला १२६ विमानांचा करार मोदी सरकारने ३६ विमानांवर का आणला? तसेच या लढाऊ विमानांची किंमत अचानक एवढी कशी वाढली? आणि ४५,००० कोटींचं कर्ज असणाऱ्या अनिल अंबानींना हे कंत्राट कसं काय देण्यात आलं? मोदी सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ? असा प्रश्न शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता ? केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का ?. याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिलं नाही, असे अनेक संशय व्यक्त करणारे प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केले आणि मोदी सरकारला कात्रीत पकडले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x