25 September 2022 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार? Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत Horoscope Today | 25 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
x

राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अनिल अंबानी समुहाकडून नोटीस

नवी दिल्ली : बहुचर्चित राफेल करारातील घोटाळ्याबाबत भाष्य करणारे काँग्रेस नेते तसेच काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांना अनिल धीरुभाई अंबानी समुहाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अनिल अंबानी समूह सुद्धा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न विचारलं जाऊ लागला आहे.

या नोटीस मध्ये अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहाने म्हटलं आहे की, ‘नेता म्हणून तुम्ही राजकीय मुद्द्यांवर भाष्य करु शकता. वादविवाद किंवा चर्चासत्रात तुमचे मत मांडू शकता. तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा आमचा प्रयत्न नाही’. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल करारावरुन काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर व्यूहरचना आखली जात असल्याचे ध्यानात येताच हे घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

त्यासाठी काँग्रेसने अशोक चव्हाण, रणदीप सुरजेवाला, संजय निरुपम, डॉ. अभिषेक मनू सिंघवी अशी टीम राफेल करारातील भ्रष्टाचारावर भाष्य करण्यासाठी उभी केली आहे. परंतु अनिल अंबानी यांच्या समूहाकडून राफेल कराराबाबाबत निराधार, खोटे आणि बदनामी करणारे विधान केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशाराच काँग्रेसला दिला आहे.

काँग्रेस अनेक दिवसांपासून राफेल युद्ध विमान खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. तसेच काँग्रेस पक्षाला राफेल कराराबाबत काही भूमिका करायची असेल किंवा इतर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला पत्रकार परिषेदच्या ४८ तासांपूर्वी त्याची कल्पना द्यावी. म्हणजे तुम्हाला आमच्या कंपनीच्या वतीने योग्य ती माहिती पुरवणे शक्य होईल, असे नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे हा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका दिल्लीतील काँग्रेस नेते कुजबुजत आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x