26 October 2021 4:24 AM
अँप डाउनलोड

आशुतोष यांच्या पाठोपाठ आशीष खेतान यांचा सुद्धा 'आप' पक्षाला रामराम

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आशुतोष काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही दिवसातच आप’ला दुसरा धक्का बसला आहे. पक्षातील अजून एक मोठे नेते तसेच पत्रकार आशीष खेतान यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आशीष खेतान अनेक दिवसांपासून पक्षाच्या कामकाजात सक्रिय पाने सहभागी होत नव्हते तसेच त्यांनी पक्षाच्या कामाकडे संपूर्णपणे कानाडोळा केला होता. त्यांनी १५ ऑगस्टलाच राजीनामा दिल्याचं वृत्त पसरलं होत. परंतु त्यांनी स्वतःच राजीनामा देण्यामागचं कारण ट्विट करून स्पष्ट केली आहेत.

ट्विट करताना आशीष खेतान यांनी म्हटलं आहे की, ‘सक्रीय राजकारणात मी सहभागी नाहीये, आता माझं संपूर्ण लक्ष हे वकिली क्षेत्राकडे आहे, तसेच आप’मधील माझा प्रवास संस्मरणीय होता. आता हा प्रवास संपुष्टात आला असून वैयक्तिक कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे त्यांनी सांगितले.. यावर अजून तरी आम आदमी पक्षातील वरिष्ठांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आशुतोष हे मूळ पत्रकारिता क्षेत्रातून राजकारणात आले होते आणि आम आदमी पक्षात सामील होण्यापूर्वी ते प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीत कार्यरत होते.

हॅशटॅग्स

#Aap(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x