27 May 2022 5:35 AM
अँप डाउनलोड

Cancer Prevention Tips | कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी या '7' सवयी अंमलात आणाच - नक्की वाचा

 Cancer prevention tips

मुंबई, २७ सप्टेंबर | कॅन्सर या रोगाबाबत माहिती आणि उपचारांपेक्षा लोकांच्या मनात भीतीच अधिक आहे. कॅन्सरनंतर रुग्णाचे आणि सोबतच त्याच्या परिवारातील लोकांवर त्याचा खूप परिणाम होतो. अनेकजण सशक्तपणे कॅन्सरशी लढा देऊन पुन्हा नव्या उत्साहाने आपल्या नेहमीच्या आयुष्यात परत येतात. पण प्रत्येकानेच स्वतःसाठी काही विशेष वेळ आणि आरोग्याची काळजी घेणे (Cancer prevention tips to reduce risk) खूप गरजेचे आहे. कर्करोगाच्या रुग्णांसाठी आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या या विशेष टीप्स;

Cancer Causes Risk Factors and Prevention :

टोबॅको टाळा :
टोबॅकोच्या सेवनामुळे कॅन्सरची भीती अधिक वाढते. सुमारे 4000 कॅन्सरच्या उत्पत्तीचे घटक यामध्ये असतात. यामुळे शरीरातील सशक्त सेल्सचा नाश होतो आणि कॅन्सरची वाढ होण्यास मदत होते. जर तुम्हांला फुफ्फुस, अन्ननलिकेचा,पोटाचा,स्वादूपिंडाचा किंवा तोंडाचा कॅन्सर असेल तर त्यापासून दूर रहा. टोबॅकोमध्ये आढळणारे निकोटीन घटक त्रासदायक असतात. तसेच धुम्रपान करणे टाळा.

मद्यपानामुळे उपचारावर पाणी :
भारतासह 11 देशात केल्या गेलेल्या संशोधनानुसार मद्यपानामुळे कॅन्सरने मृत्यू पावणार्‍यांचे आणि कॅन्सर जडण्याचे प्रमाण 38% आहे. या काळात तुमची रोगप्रतिकारशक्ती कमजोर झालेली असते. कर्करोगाशी सामना करताना मद्यपान करणे घातक ठरू शकते. यामुळे यकृत निकामी होण्याची शक्यता वाढते.

साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवा :
कॅन्सर आणि साखर हे हातात-हात घालून चालतात. अनेक अभ्यासातून पुढे आलेली एक गोष्ट म्हणजे अतिगोड खाणे, गोड ड्रिंक्स पिणे यामुळे कॅन्सरच्या सेल्सची वाढ होते. साखरेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. तसेच संसर्गाचे प्रमाण वाढते. यामुळे कॅन्सरचे उपचार सफल होणे कठीण होते.

खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत दक्ष रहा :
रेड मीट किंवा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर जडण्याची अधिक असते. हे काही अभ्यासातून पुढे आले आहे. तर फळं आणि भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून 5-7 वेळा भाजी आणि फळांचा आहारात समावेश करा. केमिकल आणि क्लोरिनविरहीत स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्या. क्लोरीनमुळे शरीरातील उपयुक्त बॅक्टेरिया मारून टाकले जातात परिणामी रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. त्यामुळे पाणी स्वच्छ गाळून, उकळून प्या.

नियमित व्यायाम करा :
नियमित व्यायाम करण्याची सवय लावा. एका संशोधनानुसार व्यायामामुळे ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर दूर ठेवण्यास मदत होते.तुमच्या उंचीनुसार योग्य वजन ठेवण्याचा प्रयत्न करा. बीएमआय वाढणे हे थेट पित्ताशय, आतड्यांचा , अन्ननलिकेच्या कॅन्सरला कारणीभूत ठरते. दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम करा.

स्वच्छता पाळा :
तोंडाची स्वच्छता पुरेशी न पाळल्यास कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते. तुम्ही तोंडाच्या कॅन्सरवर उपचार घेत असल्यास स्वच्छता अवश्य पाळा. तसेच तोंडाच्या कॅन्सरमुळे हिरड्यांचे आजार आणि दातांच्या समस्यादेखील वाढतात.

कॅन्सर जडणार्‍या गोष्टींपासून दूर रहा :
दैनंदिन कामातील अनेक वस्तू कॅन्सर जडण्यास कारणीभूत ठरतात. युव्ही रे आणि एक्स रे यांचा संपर्कात अधिक वेळ येणे हे फुफ्फुस, स्किन, थयरॉईड,ब्रेस्ट आणि पोटाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते. मोनोपॉजचा त्रास टाळण्यासाठी हार्मोन रिपलेसमेंट थेरपी घेणे टाळा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Cancer prevention tips to reduce your risk.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x