16 July 2020 12:44 AM
अँप डाउनलोड

वर्ल्ड कपचं थीम सॉंग ऐकलंत?

World Cup 2019, ICC Cricket

नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या ३० मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सध्या जगभरात क्रिकेटची जादू दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)ने शुक्रवारी समाज माध्यमांवरून वर्ल्ड कपचं थीम सॉंग शेअर केलं आहे. ‘Stand By’ असे या गाण्याचे बोल असून Rudimental या बँडने हे गाणं गायलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काल सायंकाळी साधारण ६ वाजता शेअर केलेल्या या गाण्याला तुलनेने कमी लाईक्स मिळाले आहेत. असं असलं तरी अनेक चाहत्यांनी या गाण्याला नापसंत केले आहे. साल २०११मध्ये भारतीय गायक शंकर महादेवन यांनी गायलेल्या ‘दे घुमाके’ या सुप्रसिद्ध गाण्याची तुलना सध्या Stand By बरोबर केली जात आहे. Stand By या गाण्यामध्ये युनायटेड किंगडमच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

दरम्यान, यावर्षी विश्व चषक स्पर्धेत जगभरातील १० देश सहभागी होणार आहेत. यंदा चौथ्यांदा विश्व चषक स्पर्धेचे इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी साल १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x