8 December 2021 5:40 PM
अँप डाउनलोड

सोमैयांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी 'राजकीय स्टंट' करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड | ममतादीदींच्या रोम दौऱ्यावर बंदी घातली

CM Mamata Banerjee

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर | मागील काही दिवस महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमैय्या यांच्या ‘आरोप पर्यटन दौऱ्यावरून’ मोठं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे किरीट सोमैय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांच्यावर घालण्यात आलेल्या कोल्हापूर बंदीवरून राज्यातील नेत्यांनी प्रचंड राजकारण केल्या पाहायला मिळालं. मात्र आता भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे आणि त्याला कारण ठरल्या आहेत त्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असंच म्हणावं लागेल.

Denied okay for Rome trip, Bengal CM Mamata Banerjee blasts :

इटलीच्या रोममध्ये मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ विश्व शांती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांना या कार्यक्रमास जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. मोदी माझ्यावर जळतात. त्यामुळेच त्यांनी मला रोमला जायची परवानगी नाकारली आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी रोमच्या कार्यक्रमात भाग घ्यावा अशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला जाण्यास परवानगी देण्यात येत नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांचा चीन दौराही रद्द केला होता. त्यामुळे राज्य सचिवालयाने नाराजी व्यक्त केली होती. रोममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात जर्मनीचे चान्सलर अँजेला मर्केल, पोप फ्रान्सिस आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी सहभागी झाले होणार आहेत. 6 ते 7 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमात ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत. इटलीच्या सरकराने ममता बॅनर्जींना आमंत्रित केलं होतं. निमंत्रण मिळाल्यानंतर ममतादीदींनी रोमला जाण्याची तयारीही केली होती. उद्योग जगताशीही त्या चर्चा करणार होत्या

ममता बॅनर्जी संतापल्या:
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विश्व शांती संमेलनातील हिंदूंचं प्रतिनिधीत्व राहिलं नाही. मी काही विदेशात फिरायला जात नाही. हा देशाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता. रोमने दोन महिन्यांपूर्वीच मला संपर्क साधला होता. भारत आणि बांगलादेशींना इटलीत बोलावलं जात नव्हतं. तरीही त्यांनी मला रोमला येण्याचं विशेष आमंत्रण दिलं. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने ही परवानगी नाकारली, असं सांगतानाच हिंदू धर्माच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी हिंदू महिलेला परदेशात जाण्यापासून का रोखलं? ही तर एक प्रकारची हिंसाच आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Modi government denies permission to Mamata for trip to Rome next month.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x