2 July 2020 10:09 PM
अँप डाउनलोड

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवारी सकाळी निधन झाले. काही दिवसांपासून चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे त्यांना १० ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच वर्षी जून महिन्यात सोमनाथ चॅटर्जी यांना पक्षाघाताचा झटका (सेरेब्रल अटॅक) आल्यामुळे त्यांना कोलकातातील बेले व्ह्यू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सोमनाथ चॅटर्जी हे प्रसिद्ध वकील आणि हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे पुत्र होते. भारतातील काही प्रमुख कम्युनिस्ट नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. संसदीय प्रणालीतील सर्वोच्च घटनात्मक पद असलेले लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे. १४ व्या लोकसभेत ते पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते.

१९६६ साली उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मान प्राप्त झालेले सोमनाथ चॅटर्जी हे २००४ ते २००९ या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते. पक्षादेश मानण्यास नकार दिल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. सीपीएमने त्यावेळी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर चॅटर्जी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#2018(1)#Assembly(3)#Communist(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x