नवी दिल्ली : नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची आणि त्यांच्याशी संबंधित देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च याची तुलना संबंधित अहवालात प्रसिध्द करण्यात आली होती.

या यादीत एकूण ४९ देशातील सर्वात ४९ श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांचे नाव आले असून, त्यांच्या कंदील संपत्ती नुसार जर त्यांना भारत सरकारचा खर्च भागवण्यास सांगितले तर त्यांच्या कडील ४०.३ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीतून ते भारत सरकारचा एकूण २० दिवसांचा खर्च चालवू शकतात.

असा तुलनात्मक अहवाल नुकताच ब्लूमबर्गनं २०१८ रॉबिनहूड इंडेक्समधून प्रकाशित केला होता. त्यामध्ये एकूण ४९ देशातील सर्वात ४९ श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

एकूण श्रीमंतांचा विचार केल्यास मुकेश अंबानी ५ व्या क्रमांकावर येतील, तर सायप्रस देशाचे श्रीमंत नागरिक जॉन फ्रेडिक्सन सर्वात जास्त दिवस म्हणजे एकूण ४४१ दिवस हा खर्च चालवू शकतात. अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती १०.४ बिलियन इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Mukesh Ambani can run India for 20 days with his own wealth