19 March 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा
x

मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल

Author Vineetha Mokkil

वॉशिंग्टन, ०९ मे | मागील महिन्यापासून भारतासाठी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली आहे आणि अजूनही ते सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मागील आठवड्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा आणि अँटी व्हायरल औषधांची विमानं मोठ्या प्रमाणावर भारतातील विमानतळांवर उतरल्याचे अनेक वृत्तांमध्ये समोर आलं आहे. नवी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने पार्सल लोड केल्याचे फोटोसह देशाने पहिले आहे. पण काही दिवसांपासून बहुतेक मालवाहू विमानतळ हँगर्समध्ये खोळंबून बसली आहेत. कारण रुग्णालये आणि त्याप्रमाणे वितरण कसं करावं याबाबत मोदी सरकारमध्ये गोंधळ असल्याचं म्हटलं जातंय.

अनेक राज्यांमध्ये आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन अजूनही कोरोना संबंधित मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर केवळ मागणी करत आहेत जी त्यांना अजूनही मिळत नाही. ज्यामुळे आरोग्य सेवा अनेक राज्यांमध्ये कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. याच परदेशी मदतीवरून आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय.

विशेष म्हणजे शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अमेरिकेची भारताला गेलेली मदत नेमकी कुठे आहे, असा प्रश्न विचारला गेला. पत्रकाराने थेट अमेरिकेतील करदात्यांच्या पैशासाठी तुम्ही उत्तरदायित्व असल्याचं प्रशासनाला म्हटलं. आपण येथून मदत पाठवत आहोत, पण त्याचं भारतात योग्यप्रकारे वितरण केलं जातं आहे हे तपासण्यासाठी तुम्ही काय करत आहात असा प्रश्न थेट पत्रकार परिषदेत केला.

परंतु, यावरून आता पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. दिल्लीतील एक लेखिका विनिता मोक्किल यांनी अमेरिकेतील पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांना खुले पत्र लिहिले असून, मदत न करण्याचा सल्ला दिला आहे.

लेखिका विनिता मोक्किल यांनी ‘अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र: तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले’ या शीर्षकाने लेख लिहिला आहे. दक्षिण आशियाई अमेरिकन संकेतस्थळ ‘अमेरिकन कहानी’ यावर हा लेख प्रकाशित झाला आहे. हा कालावधी भक्तांना आत्मनिरीक्षण करण्यासाठी एकदम योग्य आहे. विशेष करून राम मंदिरासाठी मतदान करणारे आणि कोरोना संकटाचा सामना करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे, ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण तडफडून मृत्यू पावत असून, दुसरीकडे तुमचा देव २२ कोटींचा महाल साकारण्यात गुंतला आहे, अशी बोचरी टीका या पत्रातून करण्यात आली आहे.

 

News English Summary: Vinita Mokkil, a Delhi-based writer, has written an open letter to Modi fans in the US, advising them not to help. Writer Vinita Mokkil wrote an open letter to Modi devotees in America. The article is titled ‘Your God’s feet are made of clay and hands are covered with blood’

News English Title: Coronavirus Author Vineetha Mokkil suggests Modi Bhakt America stop funding India news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x