28 June 2022 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

दिशा सालियान आत्महत्या प्रकरण | CBI तपासाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Mumbai High court, rejects the plea, CBI probe, Disha Salian death

मुंबई, २६ नोव्हेंबर: मागील काही महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र सीबीआयकडे प्रकरण देऊन सुद्धा काहीच हाती न लागल्याने विरोधकांचा देखील हिरमोड झाला होता. त्यानंतर राजकीय विरोधकांनी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाकडे (Sushant Singh Rajput Ex Manager Desha Salian suicide case) मोर्चा वळवला होता. वास्तविक सदर प्रकरणाची फाइल मुंबई पोलिसांनी बंद केल्यानंतर दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court rejected plea) अखेर फेटाळली आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी दिशा सालियन हिनं घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर उठलेल्या वादळानंतर दिशाच्या आत्महत्येची नव्यानं जोरदार चर्चा सुरु झाली होती. तिच्यावर लैंगिक आत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला होता. अनेक राजकीय विरोधकांनी यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील गोवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून सुशांतप्रमाणे दिशाच्या आत्महत्येचा तपासही सीबीआयकडे सोपवावा अशी विनंती जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आज संबंधित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

 

News English Summary: Bollywood actor Sushant Singh Rajput’s former manager Disha Salian’s suicide case was the front. In fact, a petition was filed in the Mumbai High Court seeking that the investigation into Disha’s death be handed over to the CBI after the Mumbai Police closed the case file. This petition has been rejected by the Mumbai High Court.

News English Title: Mumbai High court rejects the plea of CBI probe into Disha Salian death News updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x