3 December 2024 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला व्याजाने कमवेल 30000; जाणून घ्या पोस्टाच्या योजनेची फायद्याची गोष्ट - Marathi News Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
x

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक | शेतकरी आणि पोलिसांदरम्यान दगडफेक

Farmers protest, Delhi Haryana border, New Agriculture Bills

नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर: केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरयाणातील शेतकरी (Panjab and Haryana Farmers Protest against New Agriculture Bills) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी सकाळी दिल्ली-हरयाणा सीमेवर अंबालाजवळ मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुरांचा वापर केला. दुसरीकडे पोलिसांना विरोध करताना आंदोलकांनी बॅरिकेड्सवर दगडफेक केली. ते उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.

आंदोलकांना दिल्लीमध्ये घुसू न देण्यासाठी अंबाला-पटियाला सीमेवर पोलीस, आरएएफच्या तुकड्यांचा मोठा फौजफाटा (Huge Police force prsent duing during protest) सकाळपासून तैनात करण्यात आला होता. यामुळे या सीमेवर आंदोलकांना रोखताच मोठा गोंधळ उडाला. पोलिसांचे बॅरिकेड्स फेकून दिल्याने पोलिसांना आंदोलकांच्या गाड्या रोखण्यासाठी अंबाला-पटियाला सीमेवर मोठमोठे ट्रक आडवे लावले आहेत. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्या ट्रकची तोडफोड सुरु केली आहे. तसेच ते ट्रक ढकलून बाजुले केले जात आहेत.

त्यामुळे या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडूनही शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा वापर करण्यात आला. अंबाला पटियाला सीमेवर शेतकऱ्यांमध्ये (Farmers and Police fight near Ambala border) धुमश्चक्री पाहायला मिळाली. शेतकऱ्यांनी जबरदस्तीनं हरयाणा सीमेत प्रवेश मिळवला. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनीही जबरदस्तीने ट्रॅक्टर पुढे नेत जोरदार घोषणाबाजी केली.

 

News English Summary: Farmers in Punjab and Haryana (Punjab and Haryana Farmers Protest against New Agriculture Bills) have once again taken to the streets against the Centre’s new agriculture laws. On Thursday morning, Delhi Police used water cannons and tear gas to disperse a large crowd near Ambala on the Delhi-Haryana border. Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck. Tried to uproot it.

News English Title: Farmers protest near Delhi Haryana border police Tear gas on protesters News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x