15 May 2021 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

छठपूजेसाठी परवानगी मागणाऱ्यांना दिल्ली हायकोर्टाने फटकारले | विरोधक तोंडघशी

Delhi High Court, Delhi government, Ban Chhath Puja celebration

दिल्ली, १८ नोव्हेंबर: दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना छठपूजेसाठी परवानगी (Seeking permission for Chhath Puja) मागणाऱ्यांना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) चांगलेच फटकारले आहे. दिल्लीत छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनांवर निर्बंध घालण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाला कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनावर बंदी घातल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केजरीवाल सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

छठपूजेच्या सार्वजनिक आयोजनावर दिल्ली सरकारने घातलेली बंदी उठवून छठपूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी करत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र छठपूजेच्या सामूहिक आयोजनामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो, असे सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच जिवंत राहिलात तर सणवार साजरे करू शकाल. याचिकाकर्त्यांना दिल्लीतील परिस्थितीची माहिती नाही आहे. अशा परिस्थितीत गर्दी एकत्रित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना हायकोर्टाने सुनावले.

दुसरीकडे महाराष्ट्रात ट्विट करताना आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे की, ‘रावणराज चालवणारे मुघलशाही महाविकास आघाडी सरकार हिंदू सणांचा विरोध करणं कधी बंद करणार? अन्य धर्मांच्या सणांना परवानगी देण्यात जशी तप्तरता दाखवता तशीच हिंदू धर्माच्या सणांना का नाही दाखवत? महाविकास आघाडीचे निर्णय इटलीवरुन होतात का?,’ असा बोचरा सवाल राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत यांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

‘यालाच म्हणतात स्वत:च्याच हाताने स्वत:च्या तोंडाला काळं फासणं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना हे देखील माहिती नाही भाजपशासित राज्यांमध्येही छटपुजेचा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच, आरएसएस इटलीमध्येच स्थापन झाली होती, हे तर ऐतिहासिक सत्य आहे.’ असं ट्विट सचिन सावंत यांनी राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना केलं आहे.

 

News English Summary: The Delhi High Court has slammed those seeking permission for Chhath Puja as the spread of corona is on the rise in Delhi. The court has given the green light to the Delhi government’s decision to impose restrictions on public Chhath Puja events in Delhi. Therefore, the ban on the public organization of Chhath Puja has brought some relief to the Kejriwal government, which has been the target of criticism.

News English Title: High Court upholds Delhi government decision to ban Chhath Puja celebration News updates.

हॅशटॅग्स

#Delhi(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x