14 December 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

हे आहेत आरक्षणाचे दुष्परिमाण | ट्विटर वादात कंगनाची आरक्षण मुद्याला हवा

Kangana Ranaut, Reservation topic

मनाली, १८ नोव्हेंबर: देशात आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील समजला जातो. या एका मुद्द्यावरून सरकारं पडतात आणि पुन्हा नव्यानं स्थापनही केली जातात. आरक्षण देण्यासाठी नक्की निकष कोणता असावा, यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. मात्र समाज माध्यमांवरील एका चर्चेची थेट आरक्षणावर घसरली आहे आणि त्याला कारण ठरली आहे कंगना रानौत.

कारण वरिष्ठ आयपीएस अधिकारी डी. रूपा पुन्हा प्रकाश झोतात आल्या आहेत. समाज माध्यमांवर कायम ऍक्टिव्ह असणाऱ्या डी. रूपा एका ट्विटर युद्धामुळे पुन्हा माध्यमांमध्ये झळकल्या आहेत. झालं असं की, ट्विटर वर True Indology नामक अकाउंटयुजर सोबत झालेल्या वादानंतर संबंधित अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आणि त्यानंतर वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

या True Indology अकाउंटयुजर आणि डी. रूपा यांच्यादरम्यान दिवाळीच्या फटाक्यावरून ट्विटर युद्ध रंगलं आणि अखेर या वादानंतर संबंधित अकाउंट ट्विटरवरून सस्पेंड झालं आहे. डी. रूपा यांनी संबधित अकाउंटयुजर कोणत्याही माहिती किंवा ज्ञान नसताना लोकांना भ्रमित करण्याचा तसेच चुकीच्या भाषेत सरकार तसेच सामाजिक संस्थांवर टीका केल्याचा आरोप केला होता.

मात्र या वादात कंगनाने उडी घेत याचा संबंध थेट आरक्षणाशी जोडला आहे. याबाबत ट्विट करताना ती म्हणाली की, ‘हे आहेत आरक्षणाचे दुष्परिमाण, जेव्हा अयोग्य आणि पात्रता नसणाऱ्यांना पावर मिळते. मला तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल माहिती नाही, परंतु खात्रीने सांगू शकते तिची निराशा तिच्या अयोग्यतेतूनच उद्भवली आहे.

दरम्यान यापूर्वी देखील जातीच्या आधारे आरक्षण द्यावे की माणसाची आर्थिक स्थिती लक्षात घेता आरक्षण द्यावे? या महत्त्वाच्या विषयावर आता कंगना राणौतनं मतप्रदर्शन केलं होतं. त्यावेळी गरिबीच्या आधारावर आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर कंगनानं जोर दिला होता . गरिबीच्या आधारवरच नेहमी आरक्षण दिलं पाहिजे, असे कंगनाने ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितले होते. तिच्या दृष्टीने जातीच्या नावावर आरक्षण देणं बरोबर नाही. गरिबीच्या आधारावर नेहमीच आरक्षण दिले जावे. जातीच्या नावावर आरक्षण असू नये. मला माहीत आहे की, राजपूत समाज खूप संकटात सापडला आहे, परंतु ब्राह्मणांची स्थिती पाहून तर खूप वाईट वाटत असल्याची भावना कंगनानं व्यक्त केली होती.

 

News English Summary: Side effects of reservations, when unworthy and undeserving gets the power they don’t heal they only hurt, I don’t know anything about her personal life but I guarantee that her frustration is stemming out of her incompetence said Kangana Ranaut.

News English Title: Kangana Ranaut talked on reservation topic again news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x