13 April 2021 2:55 AM
अँप डाउनलोड

आमचं हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही | राऊतांचा भाजपाला टोला

Shivsena MP Sanjay Raut, BJP, Hindutva

पुणे, ३१ ऑक्टोबर: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आमचं हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यात एक वर्षांपूर्वी पर्यंत काही फरक नव्हता. आमचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व नाही असे राऊतांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बिहार निवडणुक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कंगना राणौत सर्वांवर भाष्य केलंय.

“महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू पुणे राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. पुढे बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य केलं.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut has accused BJP that our Hindutva is not limited to temple bells. Until a year ago, there was no difference between Shiv Sena’s Hindutva and BJP’s Hindutva. Raut clarified that our Hindutva is not political Hindutva. On this occasion, he commented on Bihar elections, Governor Bhagat Singh Koshyari, NCP President Sharad Pawar, Kangana Ranaut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut reply to BJP over Hindutva News Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(211)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x