29 April 2025 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Fact Check | शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याचा कंगनाचा दावा धादांत खोटा | हे आहे सत्य

Kangana Ranaut, Voting Shivsena, Fact Check, Marathi News ABP Maza

मुंबई, १९ सप्टेंबर : मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. कंगनानं केलेल्या नव्या विधानांची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ‘मी शिवसेनेला मतदान केले आणि ते माझ्यासोबत असे वागत आहेत,’ असं तिने म्हटलं आहे. मात्र कंगनाचं नाव ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, तेथून भाजपाचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान कसं केलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या मागील सत्य वेगळं आहे.

टाईम्स नाऊ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “जेव्हा मी वांद्रे येथे माझे मत देण्यासाठी गेले होते, तेव्हा वोटिंग मशिनमध्ये भाजपाचा पर्याय नसल्याने मला आश्चर्य वाटले, कारण मी भाजपा समर्थक आहे. पर्याय नसल्याने शिवसेनेला मत द्यावे. मला राजकारण समजत नाही. मला याचा अनुभव नाही. ही युती का झाली हे मला माहिती नाही, परंतु पर्याय नसल्याने मला शिवसेनेचं बटन दाबायला भाग पाडलं गेलं. कारण भाजपाचा पर्याय नव्हता. त्यांच्या युतीमुळे त्या भागासाठी फक्त शिवसेनेचाच उमेदवार होता. म्हणून मी त्यांना मत दिले आणि आणि ते माझ्याशी असं वागत आहे,’ असं कंगना म्हणाली. मात्र कंगनानं केलेलं हे विधान खोटं असल्याचे समोर आले आहे. दैनिक भास्करनं याविषयी सविस्तर वृत्त दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीत कंगनानं वांद्रे पश्चिम आणि लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघामधून मतदान केलं होतं. २००९ ते २०१९ च्या काळात तीन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या निवडणुका शिवसेनेनं महायुतीमध्ये लढवल्या. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीतून बाहेर पडली होती. युती नसल्यामुळे अंतर्गत विधानसभेसाठी वांद्रे पश्चिम आणि लोकसभेसाठी मुंबई-मध्य जागा भाजपाकडे होत्या. त्यामुळे सहाही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार तिथे नव्हता. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान केलं हे विधान खोटं ठरतं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार समोरासमोर होते. अशा वेळी कंगनाला भाजपाचाही पर्याय होता. परंतु नाईलाजाने तिला शिवसेनेला मतदान करावे लागले, असं तिनं सांगितलं.

कंगनाने खार पश्चिम येथील बीपीएम शाळेत शिवसेनेच्या नेत्याला मतदान केले होते. त्यामुळे खोट्या बातम्या देणे बंद करा असे प्रतिउत्तर दिले आहे. मात्र २०१२च्या नंतर कंगना खार पश्चिममधील डीबी ऑर्किड ब्रिज या इमारतीत राहायला आली. या इमारतीचे बांधकाम २००८ मध्ये सुरू झाले आणि सदनिकेच्या मालकांना २०१२ मध्ये ताबा देण्यात आला. या इमारतीचा पत्ता कंगनाच्या मतदार ओळखपत्रावर आहे. त्यामुळे कंगना २०१२ नंतरच तिथे राहण्यास आली हे सिद्ध होते. खार पश्चिमचा हा परिसर वांद्रे पश्चिम विधानसभा आणि मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात येतो.

मुंबई प्रेस क्लबने याची गंभीर दखल घेतली. सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला, तर पत्रकाराने सद्भावनेने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून कंगना रनौत यांनी अपशब्द वापरून अवमान केला. तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे सांगत, मंत्रालय, विधीमंडळ वार्ताहर संघाने या वृत्तीचा तीव्र निषेध केला. या घटनेची योग्य दखल घेऊन पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची हमी देण्याची मागणीही वार्ताहर संघाने केली. दरम्यान, कंगनाने यावर कोणतीच प्रतिक्रिया किंवा टिष्ट्वट संध्याकाळपर्यंत केले नव्हते.

 

News English Summary: Actress Kangana Ranaut, who is in the news for her statements about Mumbai and Mumbai Police, has once again criticized the Shiv Sena. Kangana’s new statement has started a different discussion. “I voted for Shiv Sena and they are treating me like this,” she said.

News English Title: Did Kangana Ranaut Really Vote For Shiv Sena What Is The Truth Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या