19 January 2022 1:58 AM
अँप डाउनलोड

नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब: संजय निरुपम

Sanjay Nirupam, Congress, Narendra Modi, Loksabha Election 2019

वाराणसी : मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. औरंगजेब काशीच्या गल्लीबोळात अत्याचार करण्यासाठी उतरला होता. हिंदूची मंदिरे तोडली जात होती तेव्हा हिंदू लोकांनी विरोध केला होता. जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय निरुपम यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

यावेळी पुढे बोलताना संजय निरुपम म्हणाले की, बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी ५५० रुपयांचा कर आकारला जातो. हिंदू रक्षण करण्याचा दावा करणारे मोदी काशीमध्ये मंदिरे तोडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अहंकार आहे. काशीची संस्कृती हिंदू लोकांनी औरंगजेबापासून वाचवली होती. आज औरंगजेबाचे काम नरेंद्र मोदी करत आहे असं निरुपम यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1657)#SanjayNirupam(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x