15 December 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Lakhimpur Kheri Violence | प्रत्येक भागात भाजपचे हजार कार्यकर्ते उभे करा, शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते | हरियाणा भाजपचे मुख्यमंत्री

Lakhimpur Kheri Violence

चंदीगड, ०४ ऑक्टोबर | उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने (Lakhimpur Kheri Violence) आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध होत आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पाठवले आहे. दरम्यान काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आज सकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट देणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव देखील घटनास्थळी पोहोचणार आहे.

Lakhimpur Kheri Violence. Manoharlal Khattar made an offensive statement that farmers know the language of the stick, answer as it is :

लखीमपूर खीरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अनेक योजनांचे उद्घाटन केले. त्यानंतर ते केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या बनवीरपूर गावाकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या हेलीपॅडवर कब्जा करून कृषी कायद्यांचा विरोध नोंदवला. यावेळी केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र हा काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दोन गाडीतून तिकोनिया येथील बनबीरपूर पासून वेगात गेले. दरम्यान याचवेळी यातील भाजपा कार्यकर्त्यांची गाडी शेतकऱ्यांमध्ये शिरली आणि यात अनेत शेतकरी जखमी झाले. यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतील चालकाला लोकांनी ठार केले आहे.

दुसरीकडे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली असून, यावरून विरोधकांनी आक्रमक होत टीका केली आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या, असे आक्षेपार्ह वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केले.

चंदीगड येथे एका कार्यक्रमात बोलताना मनोहर लाल खट्टर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानानंतर विरोधकांनी आक्षेप नोंदवत खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. तर संयुक्त किसान मोर्चानेही टीका करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मनोहर लाल खट्टर म्हणाले की, प्रत्येक भागात ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील, असे खट्टर यांनी म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Violence many Farmers Dead after BJP workers attacked.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x