29 May 2023 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील
x

युती केली हेच चुकलं | अन्यथा विधानसभाला १५० जागांच्या पुढे गेलो असतो - फडणवीस

Alliance BJP Shiv Sena, Maharashtra Assembly Election 2019, Devendra Fadnavis, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या असत्या, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकीताचा संदर्भ देत फडणवीस यांनी युती करून चूक केल्याची कबुली अप्रत्यक्षपणे दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?
“भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्ये सांगितलं होतं की भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत २७२+ जागा भाजपाला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांचं ते भाकित खरं ठरलं. २०१९ मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की ३००+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक पुस्तक लिहून भाजपाला पर्याय दिले होते. भाजपा १५०+ किंवा युती २००+ त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचं तिसरं भाकित खरं ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात १५०+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली ” असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘ही पश्चातबुद्धी आहे, हे त्यांनी ठरवलं पाहिजे होतं, आता त्यांना सगळी गणितं सुचत आहेत, यावर आम्ही काय बोलणार?’, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले आहेत.

मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला. भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असतानाही मुख्यमंत्रीपदावरुन या दोन्ही पक्षांनी फारकत घेतली. महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ता नाट्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सगळ्यांना धक्का देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण अवघ्या तीन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has claimed that he had made a mistake by forming an alliance with Shiv Sena in the 2019 Assembly elections. Fadnavis has made this shocking statement in the service week program organized on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday.

News English Title: Alliance With Shiv Sena Was The Mistake Other Wise BJP Won 150 Plus Seats In Maharashtra Assembly Election Says Devendra Fadnavis Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x