27 July 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Fact Check | अमिताभ बच्चन यांची दाऊद सोबत मैत्री | अशोक चव्हाण यांचा फोटो वापरून खोटी माहिती

Bollywood Superstar Amitabh Bachchan, Dawood Ibrahim, Social media, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : बॉलीवूड अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन यांनी संसदमध्ये बॉलीवूड-ड्रग्स प्रकरणावर दिलेल्या वक्तव्यावर पूर्ण बच्चन कुटुंबाला ट्रोल केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यात ते एकासोबत हात मिळवत असताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत लोक दावा करत आहे की बिग बींसोबत दिसत असलेली व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे.

काय होतंय व्हायरल:
एका फेसबुक यूजरने फोटो शेअर करत लिहिले की- ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, पर मैं आपका गुलाम हूँ..! दाऊद इब्राहिम आणि अमिताभ बच्चन यांचा जुना फोटो आता रिलीज झाला आहे म्हणूनच जया बच्चन बॉलीवूड ड्रग्स कनेक्शनवर या प्रकारे वक्तव्य करत आहे.! Shame on Amitabh Bachhan!’ हा फोटो ट्विटरवर देखील या प्रकाराचे दावा करताना व्हायरल होत आहे. अशा प्रकारे अनेक ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्स’वरून फोटो व्हायरल होतं आहे.

काय आहे सत्य:
व्हायरल फोटोला रिव्हर्स सर्च केल्यावर आम्हाला ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ ची 25 मार्च 2010 ची एक रिपोर्ट सापडली, ज्यात हा फोटो दिसून येत आहे. या फोटोसह कॅप्शन आहे की राजीव गांधी सी लिंक च्या कमिशनिंग सेरेमनी मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत अशोक चव्हाण. हा फोटो पीटीआय न्यूज एजेंसीचा असल्याचे सांगितले गेले आहे.

महाराष्ट्रनामाच्या फॅक्ट चेकमध्ये समाज माध्यमांवर व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आढळले. फोटोत अमिताभ बच्चन हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत नसून ते काँग्रेस नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत आहे. संबंधित फोटो ब्लर करून तो समाज माध्यमांवर वापरला जातं असून अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य माध्यमांनी यावर चुकीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

 

News English Summary: Following Jaya Bachchan’s Parliament speech in support of Bollywood, the entire Bachchan family is being targetted and trolled on social media. After circulating a video of ‘heavily drunk’ Shweta Bachchan, the social media users have now found a viral picture of Amitabh Bachchan in which he is allegedly seen shaking hands with underworld don Dawood Ibrahim.

News English Title: Bollywood Superstar Amitabh Bachchan with Dawood Ibrahim photo viral social media Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x