12 August 2020 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मध्य प्रदेशातील भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकिटासाठी उत्सुक?

भोपाळ : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यात मोठा फटका बसून काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता अनेक सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यात भाजपला सर्वाधिक फटका हा राजस्थान आणि मध्यप्रदेश बसण्याची शक्यता असल्याने भाजपचे विद्यमान आमदार राजकीय गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, मध्य प्रदेशच्या सत्ताधारी भाजपचे तब्बल ३० आमदार काँग्रेसच्या तिकीटावर आगामी विधानसभा निवडणुका लढवायला इच्छुक असल्याचा दावा मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के कमलनाथ यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेच वातावरण आहे. जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे, असं सुद्धा ते म्हणाले.

कमलनाथ सध्या इंदौरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी इंदौरमध्ये पदयात्रा काढून काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपमधील संभाव्य राजकीय भूकंपाची चुणूक दाखवली. तसेच काँग्रेस पक्षाने २ वेगवेगळ्या एजेंसींकडून सर्वेक्षण केल्यानंतर त्याच्या आधारावर जे विजयी होतील, अशा व्यक्तींनाच तिकीट दिलं जाईल, असं बजावून सांगितलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(394)BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x