28 September 2020 7:32 PM
अँप डाउनलोड

कलम ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त

Jammu Kashmir, India, Pakistan, Pulawama, Supreme Court

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या देशाच्या राज्यघटनेतील कलम ’३५ अ’ कलम रद्द करण्यात यावे, या मागणीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कश्मीर खोऱ्यात तणाव असून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारनंतर रात्रभरात जमात-ए-इस्लामी जम्मू-कश्मीर या संघटनेच्या जवळपास १५० जणांची धरपकड करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कलम ३५ ए आणि कलम ३७० काश्मीरला विशेष दर्जा देतात. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर या सुनावणीला विशेष महत्त्व आलं आहे. विशेष करून केंद्र सरकार काय भूमिका मांडतं याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत जम्मूमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारी भाजपा कलम ३५ अ विरोधात आहे. हे कलम रद्द करावे अशी भाजापाची भूमिका आहे. काश्मीरमधील दोन प्रादेशिक पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडिपी हे कलम रद्द करण्याच्या विरोधात आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x