26 April 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना आम्ही घाबरत नाही: संजय राऊत

मुंबई : ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूर येथे दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात शाब्दिक हमरीतुमरीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना उत्तर देताना असल्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे असे म्हटले आहे.

काल लातूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप सेनेतील युतीवरून शिवसेनेला थेट इशारा दिला होता. अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर येणार हे गृहीत होते. त्याप्रमाणे शिवसेनेने सुद्धा भाजपावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे आणि चोख प्रतिउत्तर दिले आहे.

संजय राऊत ट्विट करून म्हणाले की, ‘शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावटयांच्या इशारयाना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच “पटकवले” आहे. इतक्या लवकर विसरलात?

लातूर येथे बोलताना शाह यांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले. ‘युती होगी तो साथी को जितायेंगे नहीं हुई तो पटक देंगे’. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना त्यांनी दिली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता विद्यमान मंत्री, खासदार आणि आमदार मोठ्या राजकीय पेचात सापडले आहेत. लोकसभेत युती न झाल्यास सर्वात मोठा फटका हा शिवसेनेला बसण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x