27 July 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

संजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा ?

नवी दिल्ली : सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.

दिल्लीतील या राजकीय पक्षांच्या भेटी-गाठीने भाजपाविरुद्ध २०१९ पूर्वीच तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरू लागली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. चंद्राबाबू नायडू हे आधीच मोदीसरकार विरोधात आक्रमक झाले असताना, मागील आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी सुद्धा तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.

शरद पवार यांनी या भेटीचं वृत्त फेटाळलं असलं तरी शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी भेट झाल्याची बातमी ट्विटरवरून दिली आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x