22 September 2023 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी?
x

आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही

मुंबई : शिवसेनेतील संजय राऊतांसारख्या व्यक्तीला भाजपने कधीही महत्त्व दिलेले नाही. त्यांना केवळ प्रसार माध्यमांनी मोठे केलं. पण आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला ४ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिल.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली होती. त्यावेळी संजय राऊत टीका करताना म्हणाले होते की, सत्ता असली की कुत्रेही स्वत:ला वाघ समजू लागतात. यावेळी मुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले असता त्यांनी ही बोचरी प्रतिक्रिया दिली. पुढे ते म्हणाले की अहंकाराची बाधा कोणाला झाली आहे, हे सर्वांनाच माहित आहे असे सांगत त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

पुढे सरकारच्या कारभारासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी ८० टक्के विकास, २० टक्के राजकारण करतो. परंतु निवडणुकीत विरोधक अपप्रचार करतात. आम्ही राज्यात ३ कोटी ९८ लाख कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळालं असून, तर राज्यात २ कोटी १८ लाख जनधन खाती सुरू करण्यात आली आहे. तसेच १५ हजार ग्रामपंचायती इंटरनेटनं आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x