15 June 2021 8:48 PM
अँप डाउनलोड

भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय झालं आत्महत्यालय : राज ठाकरे

मुंबई : आमचे सरकार काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे असा दावा करणारे भाजप सरकार खरोखरच वेगळे आहे, कारण भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालाय अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही दिवस पूर्वीच शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा उपचारादरम्यान हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला होता. त्यात आता पुन्हा एका तरुणाने मंत्रालयासमोर समोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्नं केला. मंत्रालयात वारंवार होणाऱ्या या घटना पाहता महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालंय असे ते म्हणाले.

मोठा अविर्भाव आणून आमचे सरकार काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे असा दावा करणारे भाजप सरकार खरोखरच वेगळे आहे कारण भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालाय अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्राचा शेतकरी हा आता त्याच्या शेतात आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्या करून घेत आहे आणि अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे भाजप सरकार हे काँग्रेस सरकार पेक्षाही कितीतरी भयानक आहे असे राज ठाकरे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x