27 May 2022 6:13 AM
अँप डाउनलोड

जर्सी नंबर १८ ची धडाकेबाज कामगिरी, विराट आणि स्मृती दोघांची शतक

किंम्बर्ले : एकूण ६ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने १६० धावांची जबरदस्त खेळी करत त्याच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतल ३४ व शतक झळकावले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १२४ धावांनी धुव्वा उडवत तिसरी वन-डे अगदी सहज खिशात घातली. भारत एकूण ६ सामन्यांच्या मालिकेत सध्या ३-० ने आघाडीवर आहे.

दुसरीकडे महिला क्रिकेट टीम सुध्दा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी ही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महिला क्रिकेट संघानेही दक्षिण आफ्रिकेचा १७८ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. एकूण ३ सामन्यांच्या मालिकेत महिला क्रिकेट संघाने २-० ने आघाडी घेतली आहे.

भारतीय महिला संघाची फलंदाज स्मृती मानधनाने धडाकेबाज शतकी खेळी करत १३५ धावा ठोकून भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेलं. एक योगायोग म्हणजे पुरुष क्रिकेट संघातील विराट कोहली आणि महिला संघातील स्मृती मानधना या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात धडाकेबाज शतकी खेळी आणि दोघांचा जर्सी क्रमांक हा एकच म्हणजे १८ हाच आहे.

सध्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यात जबरदस्त फॉर्मात आहे.

हॅशटॅग्स

#Cricket(8)#India V/s South Africa(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x