2 July 2020 9:13 PM
अँप डाउनलोड

भारताने अमेरिकन बाइकवरील आयातशुल्क ५०% करून सुद्धा ट्रम्प यांच्याकडून नाराजी

Donald Trump, Narendra Modi

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत सरकारच्या उद्योगिक संबंधांवर टीका केली आहे. भारत सरकार यापूर्वी अमेरिकेच्या मोटारसायकलवर १०० टक्के आयात शुल्क आकारत होता. आता जरी त्यांनी तो ५०% इतका केला असला तरी देखील तो जास्तच आहे असं सूर लावला आहे. आमच्या सरकारला हे मान्य नाही, असं मत व्यक्त करत डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

CBS न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तीव्र शब्दात टीका केली आहे. अमेरिकाला आता आणखी मूर्ख बनवता येणार नाही. आमचा देश काही मूर्ख नाही. त्यामुळे आम्हाला फसवता येणार नाही. असं असलं तरी भारत आमचा मित्र देश आहे. मोदी तुम्ही आमच्या मोटारसायकलवर १०० टक्के कर आकारता. दरम्यान आम्ही तुमच्याकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन या बाइकवर लावल्यात येणाऱ्या आयात शुल्कासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारतानं यावर लावलेला आयात शुल्क हे पूर्णपणे माफ म्हणजे शून्य करायला हवा, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे.

पुढे ट्रम्प म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन कॉल केल्यानंतर त्यांनी १०० टक्क्यांवरचा आयात शुल्क ५० टक्क्यांवर आणलं. परंतु तेसुद्धा मला मान्य नाही असं ते मुलाखतीत म्हणाले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Donald Trump(68)#Narendra Modi(1233)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x