23 September 2019 11:08 AM
अँप डाउनलोड

पश्चिम बंगालमध्ये राजकीय धुसपूस शिगेला, गावठी बॉम्बचे हल्ले सुरु

West Bengal, Mamta Banerjee, Amit Shah, West Bengal Assembly Election 2021

कांकीनाराः पश्चिम बंगालमधल्या कांकीनारा भागात गावठी बॉम्बच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद मुख्तार (६८) ही व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. स्थानिक वर्मनपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ परगणा जिल्ह्यातील काकीनारा भागात बरुईपाला येथे मृत मोहम्मद मुख्यार आणि त्याचा परिवार, तसेच शेजारी घराबाहेर बसले होते. त्याचदरम्यान कोणी तरी बॉम्ब फेकला.

दरम्यान काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसपूस वाढली असून पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच केलं होता. तसेच काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात आला. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्य सरकारच्या मनमानी विरोधात सोमवारी बशीरहाटमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात आला होता. तसेच भाजपा संपूर्ण राज्यात काळा दिवस पाळला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील वाद विकोपाला जात आहे. शनिवारी परगना जिल्ह्यामध्ये पार्टीचे झेंडे काढून फेकल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली असल्याचा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. तर १८ जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर तृणमुल काँग्रेसनेही त्यांच्या ३ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या