23 September 2019 11:09 AM
अँप डाउनलोड

उन्मत्त भाजप खासदाराने पोलिसाच्या कानाखाली मारत, ठार मारण्याची धमकी दिली

Yogi Adityanath, Narendra Modi

उत्तर प्रदेश: लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार बहुमताने सत्तेत पुन्हा विराजमान झाले आणि याच लोकसभा निवडणुकीत अनेकांची लॉटरी लागल्याने त्यातील काही खासदार डोक्यात सत्तेची हवा गेल्यासारखे वागत आहेत. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडलेला आहे. उत्तर प्रदेशातील धौरहरा मतदारसंघाच्या भाजप खासदार रेखा वर्मा यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला श्रीमुखात मारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संबंधित पोलीस शिपायाचे नाव श्याम सिंग असून त्याने लखीमपूर खिरी येथील मोहम्मदी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार खासदार भाजप रेखा वर्मा यांच्या विरुद्ध आयपीसी ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि २७४ ही कलम लावण्यात आली आहेत. संबंधित पोलीस शिपायाने आरोप करताना म्हटलं आहे की, ‘भाजप खासदार रेखा वर्मा यांना मला कानाखाली मारली आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत मला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिथून निघून गेल्या’. अपेक्षा आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि तसे न झाल्यास मी स्वतः आत्महत्या करेन असा इशाराच सरकारी यंत्रणेला दिला आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Narendra Modi(981)#Yogi Government(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या