13 August 2022 8:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा
x

तो जोरात पसरतोय; केरळने एका दिवसात महाराष्ट्राला मागे टाकले; तब्बल २८ पॉझिटिव्ह

Corona Crisis, Kerala, CM Pinarayi Vijayan

मुंबई, २३ मार्च : कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू आहे. जगभरात १३ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात २४ तासांत तब्बल १५ रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगान वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९६ वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरात ८० हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता.

दरम्यान, मागील २४ तासात केरळ राज्याने देशात सर्वात पुढे असणाऱ्या महाराष्ट्रातील बाधितांच्या आकडेवारीला मागे टाकल्याने कोरोनाचा फैलाव किती जोराने सुरु झाला आहे याचा प्रत्यय येतो. स्वतः केरळचे मुख्यमंत्र्यांनी तशी माहिती पीटीआयला दिली आहे.

महाराष्ट्रात सर्वतोपरी काळजी घ्या असं आवाहन राज्य आणि केंद्र सरकारतर्फे करण्यात आलं आहे. तसंच घराबाहेर पडू नका असंही आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात करोाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

 

News English Summery: The coronary virus is spreading worldwide. More than 13,000 people have died worldwide. Shockingly, Maharashtra has seen an increase of three patients in 24 hours. The number of coronary patients in Maharashtra has reached 89. Concerns have been raised over the last two days as the number of corona virus patients is increasing in Maharashtra. In India, seven people have died so far while the number of coronary patients has risen to 396. Meanwhile, more than 80 new patients have been found across the country in the last 24 hours. A curfew was observed to prevent Corona outbreak on Sunday. Meanwhile, over the past 24 hours, the Kerala state has surpassed the rest of Maharashtra’s disruptive statistics in the country, confirming how strongly Corona’s spread has begun. Kerala Chief Minister himself informed the PTI.

 

News English Title:  Story Twenty eight positive cases reported in Kerala on Monday taking the number of those undergoing treatment to 92 said Chief Minister Pinarayi Vijayan News latest updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x