5 June 2023 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या Cash Transactions | तुम्हीही खूप कॅश ट्रान्झॅक्शन्स करत असाल तर नियम जाणून घ्या आणि इन्कम टॅक्स नोटीस टाळा
x

VIDEO | मोदींच्या वाढदिवसादिनी भाजप आणि गोदी मीडिया असं अभियान राबवणार | आधीच केली होती पोलखोल

Journalist Sakshi Joshi

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. मोदी आज ७१ वर्षांचे झाले. याचनिमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्वतः नरेंद्र मोदी, मोदी सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आधीच निश्चित करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आहे.

मोदींच्या वाढदिवसादिनी भाजप आणि गोदी मीडिया कसं अभियान राबवणार, या पत्रकाराने आधीच सांगितलेलं – Journalist Sakshi Joshi was explained the BJP propaganda in advance on the occasion of PM Narendra Modi’s 71Th birthday :

मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.

भाजप आयटी सेलच्या करामती आणि फॅक्टचेक:
अनेक ठिकाणी ऑनलाईन काही विशिष्ठ डॉक्युमेंट्स शेअर करत पद्धतीशीर कॅम्पेन राबवून कॉपी पेस्ट साठी शब्द पुरविण्यात आले असून त्यातून ठराविक हॅशटॅग समाज माध्यमांवर भाजप आयटी सेलने आधीच सुरु केल्याचं फॅक्टचेक मध्ये उघड झालं आहे.

गोदि मोडीयातील पत्रकारही सामील:
आज मोदींचा जयजयकार करण्यासाठी गोदि मोडीयातील पत्रकारही सामील झाले आहेत. विशेष म्हणजे त्यातही ते शुभेच्या देताना स्वतःचे शब्द न वापरता गोदि मोडीयातील इतर पत्रकारांच्या किंवा मोदी समर्थकांच्या शुभेच्या ‘गुगल ट्रान्सलेट’ द्वारे कॉपी पेस्ट करून स्वतःच्या बुद्धी इथेही गहाण ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय. खालील दीपक चौरासिया यांचं ट्विट तेच अधोरेखित करतंय.

विशेष म्हणजे साक्षी जोशी या महिला पत्रकाराने मोदींच्या ७१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतं अभियान राबवून मोदींची प्रतिमा पुन्हा मोठी करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप आणि गोदी मोडियाकडून केला जाणार आहे हे त्या महिला पत्रकाराने एक आठवडा आधीच सूचित केलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Journalist Sakshi Joshi was explained the BJP propaganda in advance on the occasion of PM Narendra Modi’s 71Th birthday.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1663)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x