29 March 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

ड्रायव्हिंग लायसन्स, RC बूक | वाहनांच्या सर्व कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत

Validity extended, Vehicular documents, DLS RCS permits

नवी दिल्ली, २७ डिसेंबर: कोरोना वायरस संकटकाळामध्ये आता केंद्र सरकारने वाहनांशी निगडीत नियम आणि कागदपत्रांच्या नियमांमध्ये पुन्हा शिथिलता देत वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांचं रजिस्ट्रेशन आणि फीटनेस सर्टिफिकेट्स यासारखी महत्त्वाची कागदपत्र आता रिन्यू करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पासून संपली असेल तरी त्याला 31 मार्च 2021 पर्यंत वॅलिड मानलं जाणार आहे. कोरोना वायरसच्या या काळात सरकारने हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज काही वेळापूर्वीच केंद्रीय परिवहन खात्याने याबाबत माहिती दिली आहे. (The validity of vehicular documents like DLs, RCs, Permits extended till 31st Mach 2021 in the light of need to prevent spread of COVID19)

केंद्र सरकारकडून चौथ्यांदा अशाप्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सरकारने डॉक्युमेंट्स 31 डिसेंबर पर्यंत ग्राह्य धरले जातील असे सांगितले होते. त्यामुळे सध्या अनेकांची धावपळ सुरू होती. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार काही कमर्शिअल वाहन मालकांनी काही काळ अजून सवलत मिळावी असे अपिल केले होते. यामध्ये काही वाहनं अद्याप उतरवू शकत नसलेल्यांचा समावेश होता. दरम्यान त्यामध्ये स्कूल बस ऑपरेटर्स देखील सहभागी होते. (According to media reports, some commercial vehicle owners had appealed for some more concessions)

फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) सह प्रमुख कागदपत्र आता तुम्ही अपडेट केली नसली तरीही तुम्हांला घाबरून जाण्याची किंवा दंड भरावा लागण्याची काहीच गरज नाही.

 

News English Summary: The validity of vehicular documents like DLs, RCs, Permits extended till 31st Mach 2021 in the light of need to prevent spread of COVID19. Ministry has today issued a directory to the States and Union Territory administrations in this regard said Ministry of Road Transport & Highways.

News English Title: Validity of vehicular documents like DLS RCS permits extended till 31st March 2021 news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x