20 May 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत

Bajaj Pulsar NS400Z

Bajaj Pulsar NS400Z | बजाजची सर्वात शक्तिशाली पल्सर NS400Z भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. तसेच ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त मोटारसायकल आहे. दमदार 373 सीसी इंजिन असूनही याची एक्स शोरूम किंमत फक्त 1.85 लाख रुपये आहे.

कंपनीने या नव्या पल्सरच्या इंजिनमध्येही बदल केले आहेत. हे इंजिन E20 इंधनाला सपोर्ट करते. त्यामुळे त्याचे मायलेजही चांगले होईल. तसेच E20 ची किंमतही पेट्रोलपेक्षा कमी आहे. E20 मध्ये पेट्रोलसोबत इथेनॉलचा वापर केला जातो.

E20 हा पेट्रोल फॉर्मेट आहे. जे पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. 2025 पर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्याचे नियोजन सुरू आहे. म्हणजेच E20 चे रूपांतर ई 50 मध्ये केले जाईल. इथेनॉल मिक्स पेट्रोल बाजारात आणणारी जिओ-बीपी ही देशातील पहिली कंपनी आहे. जिओ-बीपीच्या निवडक पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल उपलब्ध होऊ लागले आहे.

पल्सर NS400Z इंजिन
पल्सर NS400Z मध्ये 373cc सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 8800rpm वर 40PS पॉवर आणि 6500rpm वर 35NM टॉर्क जनरेट करते. यात स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक ताशी 154kmph वेगाने धावू शकते. यात 12 लिटरक्षमतेची फ्यूल टँक आहे. याचे मायलेज 27 किमी प्रति लीटर च्या आसपास असू शकते.

E20 इंधन म्हणजे काय?
इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल (C2H5OH) एक जैवइंधन आहे जे नैसर्गिकरित्या उद्भवणार्या शर्करा आंबवून बनविलेले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी भारताने हे जैवइंधन पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम सुरू केला आहे. E20 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल मिश्रण दर्शविते. E20 मधील 20 हा आकडा पेट्रोल मिश्रणातील इथेनॉलचे प्रमाण दर्शवितो. म्हणजेच संख्या जितकी जास्त तितकी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण जास्त असते.

1 लीटर E20 पेट्रोल ची किंमत गणित
जिओ-बीपीने तयार केलेल्या E20० पेट्रोलमध्ये 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल असते. दिल्लीत पेट्रोलचा दर 96 रुपये प्रति लीटर आहे. म्हणजेच 96 रुपयांनुसार पेट्रोलची 80 टक्के किंमत 76.80 रुपये होते. त्याचप्रमाणे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर 55 रुपयांपर्यंत आहे. म्हणजे 55 रुपये दराने 20 टक्के इथेनॉलची किंमत 11 रुपये होते. म्हणजेच एक लिटर E20 पेट्रोलमध्ये 76.80 रुपयांचे नॉर्मल पेट्रोल आणि 11 रुपयांचे इथेनॉल आहे. अशा प्रकारे एक लीटर E20 पेट्रोलची किंमत 87.80 रुपये होते. म्हणजेच सामान्य पेट्रोलच्या तुलनेत ते 8.20 रुपयांनी स्वस्त आहे.

News Title : Bajaj Pulsar NS400Z E20 fuel check details 08 May 2024.

हॅशटॅग्स

#Bajaj Pulsar NS400Z(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x