खड्डेमुक्त मुंबईची मुख्यमंत्र्यांची गर्जना, मात्र शिंदे पुत्राच्या बंगल्यापासूनच खड्डेमय कल्याणची अशी पोलखोल झाली होती
CM Eknath Shinde | इंडिया टुडे कॉनक्लेव्हच्या मंचावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची डेडलाईन सांगितली. मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा मुलाखतीदरम्यान उपस्थित करण्यात आला. आजही मुंबईत थोडाफार पाऊस होतो, तेव्हा गाड्या नीट चालू शकत नाही. मुंबई आजही ट्रॅफिकची समस्या आहे. मेट्रोचा प्रोजेक्ट निर्धारित वेळ निघून गेली, तरीही सुरूच आहे. वेळेत पूर्ण होत नाहीये. कारण मुंबईतील रस्ते जोपर्यंत सुधारणार नाही, तोपर्यंत पुढील काम कसं होईल? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला.
मुंबईतल्या रस्त्यांबद्दल बोलताना
मुंबईतल्या रस्त्यांबद्दल आणि प्रोजेक्टबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आमचं सरकार आल्यानंतर मी महापालिका आयुक्त चहल यांना बोलावलं. त्यांना विचारलं की, खड्ड्यांचं माध्यमात का दाखवलं जातंय? लोकांना त्रास होतोय. काय कारण आहे? ते म्हणाले, ‘आम्ही दरवर्षी ५० किमी रस्त्यांचं सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
त्यांना मी विचारलं की पैसे नाहीत का? ते म्हणाले की आहेत. मग म्हटलं का थांबलंय? ५०० किमी रस्त्यांचं काम हाती घ्या. ५,५०० कोटींचे रस्त्यांचं सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. जे शिल्लक आहेत ४१३ किमी रस्ते, तेही मार्चमध्ये सुरू होईल. मुंबईतील पूर्ण रस्ते सिमेंटचे होतील. दोन वर्षात हे काम होईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तुम्हाला पुन्हा बोलावलं आणि विचारलं की झाले की नाही झाले तर?, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले, “जेव्हा तुम्ही मला बोलवाल. तेव्हा तुम्हाला बरंच काही बदलेलं दिसेल. मुंबईत शंभर टक्के रस्ते सिमेंटपासून बनवले जातील, तुम्हाला रस्ते शोधावे लागतील. मी हे खरं बोलतोय. मुंबईच्या सौंदर्यीकरणावरही आम्ही काम करतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सध्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आणि त्यात मुंबई महानगरपालिका या मोठ्या बजेटच्या महापालिकेवर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते केंद्रित झाले आहेत. कारण, असे मुद्दे ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड किंवा नाशिक महापालिकेत उचलले गेल्यास आपलीच राजकीय कोंडी होईल हे त्यांना ठाऊक आहे. तसेच आधी ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या अवस्थेवरून शिंदे पिता-पुत्राला लक्ष करणारी मनसे आज ठाणे आणि कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड किंवा नाशिक महापालिकेच्या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करत आहे असं देखील निदर्शनाला येतंय. कारण, शिंदे-पिता पुत्राच्या आणि भाजपच्या सध्या शिवतीर्थावर भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे मनसेचे राजकीय हेतू सुद्धा स्पष्ट होतं आहेत आणि ते मतदारांना सुद्धा कळतंय.
ऑगस्ट २०२० मध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यापासूनच कल्याणमधील रस्त्यांची कशी दुर्दशा आहे हे व्हिडिओ शूट करून दाखवलं होतं. त्यामुळे सध्याच्या मनसेच्या भूमिका या लोकांच्या समस्यांप्रती राहिल्या नसून त्या नेहमी बदलत राहणाऱ्या राजकीय कुहेतूने प्रेरित असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे आणि याचा मनसेला आगामी निवडणुकीत सुद्धा फटका बसू शकतो असं म्हटलं जातंय.
#VIDEO – खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यापासूनच कल्याणच्या खड्ड्यांची कशी चाळण झाली आहे याचा व्हिडिओच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन बनवला आणि शिंदे शाहीची पोलखोल केल्याचं म्हटलं जातं आहे.@mnsadhikrut @rajupatilmanase @DrSEShinde @CMOMaharashtra pic.twitter.com/AJULmD9CCB
— महाराष्ट्रनामा (@MahaNewsConnect) August 26, 2020
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CM Eknath Shinde talked on BMC road quality before election check details 04 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News