11 December 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Marriage Loan | लग्न करायचे आहे पण हातात पैसे नाही? अनेकजण बँकेतून लोन घेण्याचा मार्ग स्वीकारत आहेत, अधिक जाणून घ्या

Marriage Loan

Marriage Loan | तुळशीचे लग्न लागले की अनेक जण बोहल्यावर बसण्याच्या तयारीला लागतात. लग्न म्हटल्यावर अफलातून खर्च होत असतो. यात बस्ता बांधनी, नवरीचा पोषाख, नवरगेवासाठी सोन्याचे दागीने, मानपाण, हळदी, डिजे, फोटोग्राफर अशा विविध ठिकाणी पैसा खर्च होतो. त्यामुळे अनेक जण पैसे साठवतात आणि लग्न पुढील वर्षी करण्याचा निर्णय घेतात.

पैसे साठवण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे अनेक जण सावकाराकडे लग्नासाठी उसणे पैसे घेतात. यात थोडी रिस्क असते. मात्र लग्नाची तुमची चिंता आता पूर्णपणे मिटणार आहे. हातात खुप कमी पैसे असताना देखील तुम्ही धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवू शकता. यासाठी तुम्हाला बॅंक कर्ज देते.

खुप कमी व्यक्तींना याची माहिती आहे. घर खरेदी, कार आणि विविध गोष्टींसाठी आपण कर्ज घेतो आणि हप्ते भरत ते पूर्ण करतो. अगदी तशाच प्रकारे तुम्ही लग्नासाठी देखील बॅंकेतून कर्ज घेऊ शकता. यात तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील आणि कर्ज कसे मिळेल याची माहिती जाणून घेऊ.

लग्नासाठी अनेक बॅंका कर्ज देत असतात. यात HDFC,SBI,PNB या बॅंका विशेष पसंतीच्या आहेत. कारण इथे खुप सवलतींवर कर्ज दिले जाते. यात कोणत्याही व्यक्तीला ५० हजार ते २० लाखांपर्यंत कर्ज घेण्याची मुभा आहे. यात सुनिश्चित वेळ देखील दिला जातो. त्यामुळे कर्ज फेडण्यास मदत होते. मात्र तुम्हाला याचे हप्ते वेळेत भरणे गरजेचे आहे.

या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला १२ ते ६० महिन्याचा कालावधी मिळतो. तसेच हे कर्ज तुम्हाला वयाच्या २१ व्या वयानंतरच घेता येते. तसेच बहुतेक वेळा हे कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी दिला जातो. लग्नासाठी कर्ज घेण्याची कमाल वयो मर्यादा ५८ वर्षांपर्यंतची आहे. यावर आणखीन एक अट आहे. ती म्हणजे यासाठी तुमचा मासीक पगार किंवा उत्पन्न कमितकमी १५ हजार असावे.

यात अन्यही काही अटी आहेत जसे की तुमचा सिबिल स्कोर ७०० पेक्षा जास्त असावा. लोनसाठी प्रक्रीया शुल्क २.५० टक्के भरावे लागेल. सिबिल स्कोर जर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही. कोणतेही कर्ज घेताना हा निकश पाहिला जातो. त्यामुळे तुम्ही सिबिल स्कोर ७०० पेक्षा जास्त ठेवणे गरजेचे आहे.

जर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बॅंकेत जाण्यास वेळ नसेल तर तुम्ही ऑनलाइन कर्ज घेऊ शकता. यात तुम्हाला HDFC ही बॅंक मदत करते. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मोबाईल क्रमांक, जन्म तारीख आणि आवश्याक कागदपत्रे जमा करावी लागतील त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येतो. यात कर्ज फेडण्यासाठी किमान ६ तर कमाल ६० वर्षांचा कालावधी देण्यात येतो. जर तुम्ही १ लाखाचे कर्ज घेतले तर तुम्हाला १०४९ टक्के व्याज दर भरावा लागतो. यात आणि प्रक्रिया शुल्क मिळून ९,२६३ एवढी रक्कम होते. तर इएमआय २१४९ रुपये दर महा भरावा लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Marriage Loan If you want to get married but do not have money the bank will arrange your marriage in a flash 04 November 2022.

हॅशटॅग्स

Marriage Loan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x