18 April 2024 11:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

त्या गुजराती आणि मारवाड्यांना विचारा तुम्ही तुमची राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? राज ठाकरेंचा राज्यपालांना प्रश्न

MNS Chief Raj Thackeray

MNS Chief Raj Thackeray | गोरेगाव येथील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांना हात घातला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.

यावेळी राज्यपालांना लक्ष करताना राज ठाकरे म्हणाले, ‘आमचं धोतर म्हटलं नाही का? वय काय बोलतो काय? राज्यपाल पदावर बसलात म्हणून मान राखतो, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. राज्यपालजी त्यांना विचारा तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आला? महाराष्ट्र काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाहीये. आजही प्रकल्प येणार असेल तर त्याचा पहिला पर्याय महाराष्ट्रच असतो, असंही राज ठाकरे यांनी म्हणाले आहेत.

राज्यपाल महिन्याभरापूर्वी काय म्हणाले? म्हणे, इथले गुजराती आणि मारवाडी परत गेले तर काय होईल? कोश्यारी जी पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा की तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती आहात ना, व्यापारी आहात ना? मग आपल्या क्षेत्रात का उद्योगधंदे नाही थाटलेत?”, असे सवाल राज ठाकरेंनी केले. याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी महाराष्ट्रासाठी सुपीक जमीन नव्हती. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा. महाराष्ट्र मोठाच होता आणि आहे. देश नव्हता तेव्हा या भागाला हिंद प्रांत म्हणत”, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray target Uddhav Thackeray over his disease check details on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#MNS Chief Raj Thackeray(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x