13 December 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Sameer Dawood Wankhede | समीर दाऊद वानखेडे, फ्रॉड इथून सुरु होतो - नवाब मलिक

Sameer Dawood Wankhede

मुंबई, 25 ऑक्टोबर | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे. तसेच काही कागदपत्रेही ट्विट करून यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असंही म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही (Sameer Dawood Wankhede) फोटो व्हायरल झाला आहे.

Sameer Dawood Wankhede. NCP spokesperson Nawab Malik has tweeted an old photo of NCB official Sameer Wankhede. This is a photo of Wankhede at a very young age. Who recognized it? That is the question :

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबतचे दोन ट्विट केलं आहे. पहिल्या ट्विटमध्ये मलिक यांनी वानखेडे यांचा पहिल्या विवाहातील फोटो पूर्ण न टाकता केवळ समीर वानखेडेंचा सिंगल फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अत्यंत जुना आणि तरुणपणीचा आहे. त्यावर मलिक यांनी पैचान कौन? असा सवाल केला आहे.

मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असं म्हटलं आहे. मलिक यांनी पोस्ट केलेलं सर्टिफिकेट हे बर्थ सर्टिफिकेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कसलं आहे याला कुणीही दुजोरा दिलेला नाही.

पहिल्या लग्नाचे फोटो समाज माध्यमांवर देखील व्हायरल:
दरम्यान, मलिक यांच्या पहिल्या लग्नाचा फोटोही व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच जण दिसतात. त्यात वानखेडेही आहेत. सोबत डॉ. शबाना कुरेशीही आहेत. त्या त्यांची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या फोटोच्या सत्यतेबाबत अजून अधिक माहिती बाहेर येईल अशी शक्यता आहे. मलिक यांनी लागोपाठ दोन ट्विट केले आहेत. आज दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन या ट्विटबद्दल अधिक खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sameer Dawood Wankhede now minister Nawab Malik again exposed history of Sameer Wankhede.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x