24 January 2025 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा
x

...नाहीतर बुलडोझरखाली चिरडेन! गडकरींचा कंत्राटदारांना दम

मोदी सरकारमध्ये मेरिट वर असलेले मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या शैलीतून कंत्राटदारांना धारेवर धरत असतात, परंतु त्यात हेतू मात्र जनहिताचा असतो म्हणून कि काय त्यांच्या विधानांना कोणी विरोध करत नसावेत. तसच काहीस घडलं आहे, बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना इशारा वजा धमकीच देऊन टाकली.

नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना दिलेल्या धमकीमुळे सध्या ते चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘काम योग्य नाही झालं तर बुलडोझर खाली मातीच्या जागी तुम्हाला चिरडून टाकीन’, अशी इशारा वजा धमकीच त्यांनी कंत्राटदारांना देऊन टाकली. अर्थात त्या मागे त्यांचा हेतू जनहिताचाच होता असे म्हणायला हरकत नाही. पण त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत.

गरिबांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये असं त्यांच नेहमी प्रामाणिक मत असतं, आणि देशातील पैसा हा कंत्रादारांचा नसून तो सामान्य गोरगरिबांचा आहे हे विधान करायला ते विसरले नाहीत. बेतुलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानसुद्धा उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x