28 March 2023 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Artemis Electricals Share Price | हा शेअर दहापट स्वस्तात मिळणार, रेकॉर्ड डेट जाहीर, फायद्यासाठी डिटेल्स पहा Quick Money Shares | 5 दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे 97 टक्के पेक्षा जास्त वाढले, टॉप शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, मजबूत फायदा SBI Credit Card | एसबीआय बँक क्रेडिट कार्डचे नियम बदलले, हे लक्षात ठेवा आणि फायद्यात राहा IRCTC Railway Ticket Discount | खुशखबर! वरिष्ठ नागरिक रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, तिकीट मध्ये पुन्हा सूट मिळणार? Facial Cleansing | त्वचा टॅन होते आणि त्वचेवर धूळ बसते, पार्लरमध्ये न जाता 'या' स्टेप्सने घरीच तुमचा चेहरा करा स्वच्छ Max Cinema Hall | हा छोटा मिनी प्रोजेक्टर घरात चित्रपट गृह आणि क्रिकेट स्टेडियमचा आनंद देतोय, किंमत आणि फीचर्समुळे प्रचंड मागणी IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही
x

भाजपसाठी धोक्याची घंटा, मोदींची हवा फक्त गुजरातमध्ये शिल्लक, 3 पैकी हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेत जनतेने मोदींना नाकारलं

Gujarat Assembly Election 2022

Gujarat Assembly Election Result | देशाचं लक्ष लागल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभआ निवडणुकीचे एकूण कल समोर आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे, पण त्यासाठी पंतप्रधान मोदींना गुजरातमध्ये ठाण मांडून बसावं लागलं आणि ५० हुन अधिक सभा घ्याव्या लागल्या होत्या. तर हिमाचल प्रदेशातली सत्ता मात्र भाजपला गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. मीच उमेदवार असे समजून मतदान करा असं करूनही हिमाचल प्रदेशातील मतदारांनी भाजपाला सत्तेतून पायउतार केल्याने तिथे मोदींची राजकीय फेसव्हॅल्यू संपल्यात जमा आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. तत्पूर्वी, म्हणजे काल दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीतही जनतेने भाजपाची १५ वर्षांपासूनची सत्ता उलटून टाकली आणि तिथेही महत्वाच्या निवडणुकीत मोदींचा चेहरा नाकारण्यात आला.

विशेष म्हणजे आजच्या लोकसभा आणि विधानसभेच्या सात विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपला कामगिरी खराब झाल्याने मोदी हवा केवळ गुजरातमध्ये मर्यादित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या हातून हिमाचल प्रदेशाची सत्ता जवळजवळ गेली आहे. हिमाचल प्रदेशात भाजप फक्त 25 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन जागांवर इतर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला हिमाचल प्रदेशातील सत्ता गमवावी लागण्याचे चित्रं स्पष्ट झाल्याने भाजपने शिमलामध्ये तातडीची बैठक बोलावली आहे.

दरम्यान, देशातील एकूण ३ महत्वाच्या निवडणुकीत भाजपने केवळ गुजरातमधील सत्ता राखली आहे आणि इतर दोन महत्वाच्या निवडणुकीत सत्ता गमावल्याने भाजपची चिंता वाढली आहे. मात्र ते भासू नये म्हणून केवळ गुजरात मर्यादित चर्चा रंगवल्या जातं आहेत आणि भाजप नेत्यांना तसे आदेशही देण्यात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title:  3 Major election results in India check details on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly Election 2022(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x