19 April 2024 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राहुल गांधींमुळे त्याच क्षणी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार होते

Former PM of India Manmohan Singh, resignation, Montek Singh Ahluwalia

नवी दिल्ली: नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष यांनी लिहिलेलं ‘बॅकस्टेज : द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाई ग्रोथ ईअर्स’ हे पुस्तक रविवारी प्रकाशित झालं. या पुस्तकात युपीए सरकारच्या काळातील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयीच्या घटनेबद्दल अहलुवालिया यांनी लिहिलं आहे.

मोंटेक सिंह अहलुवालिया यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या २०१३मध्ये अध्यादेश फाडण्यासंबंधीच्या घटनाक्रमानंतर तत्कालीन पंतप्रधानांनी माझ्याकडे विचारणा केली होती की मी राजीनामा देऊ का?, असा गौप्यस्फोट अहलुवालियांनी केला आहे.

अहलुवालिया यांनी काय सांगितलं?
“मी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधानांसोबत गेलेल्या शिष्टमंडळात होतो. त्यावेळी माझा भाऊ जो आयएएस पदावरून निवृत्त झाला आहे. त्याने मला सांगितलं की, ‘एक लेख लिहिला आहे जो पंतप्रधानांसाठी महत्त्वाचा आहे.’ त्याने तो लेख मेल केला. त्याचबरोबर ‘हा लेख वाईट तर नाही ना?’ अशी विचारणाही केली. हा लेख घेऊन मी पंतप्रधानांकडे (मनमोहन सिगं) गेलो. त्यांनी सगळ्यात आधी माझं ऐकावं अशी माझी इच्छा होती. त्यांनी तो लेख शांततेनं वाचला, पण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर अचानक मनमोहन सिंग यांनी विचारलं की, मी राजीनामा द्यायला हवा का?, अशी विचारणा केली. त्यावर या मुद्यावर राजीनामा देणं उपयोगी नाही, असं मी त्यांना सांगितलं,” असं अहलुवालिया यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

 

Web Title: Story Former PM of India Manmohan Singh had think about resignation says Montek Singh Ahluwalia.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x