26 May 2022 8:55 PM
अँप डाउनलोड

भारत-फ्रान्स दरम्यान महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन सध्या भारत भेटीवर आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांच्या दरम्यान महत्वाच्या १४ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये रेल्वे, ऊर्जा, संरक्षण आणि स्मार्ट सिटीसारख्या अनेक महत्वाच्या करारांचा समावेश आहे.

फ्रान्स बाबत बोलताना नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स सोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा उल्लेखही आवर्जून केला. पुढे ते असे ही म्हणाले की जागतिक पातळीवरील प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी भारताला फ्रान्सची खूप मदत होत असल्याचा उल्लेख केला.

नरेंद्र मोदी असे ही की फ्रान्स आणि भारतामधील सांस्कृतिक संबंध इतिहासापासून आहेत आणि विशेष करून संरक्षण, सुरक्षा, अंतराळ आणि तंत्रज्ञानात क्षेत्रातील देवाण घेवाणीत दोन्ही देशांमधील संबंध प्रदीर्घ मैत्रीचे आहेत. सरकार जरी कोणतेही असले तरी भारत आणि फ्रान्स मधील संबंध नेहमीच वरच्या पातळीवर पोहोचले आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांनी बोलताना भारत-फ्रान्स हे सर्वोत्कृष्ट भागीदार असल्याचे सांगितले. संशोधन, संरक्षण तसेच विज्ञान आणि तरुणांना उच्च शिक्षण प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात भारत आणि फ्रान्स एकमेकांना सहकार्य करतील असे म्हणाले. तसेच सामरिक क्षेत्रात भागीदारीचे नवे युग सुरु करण्याचा आमचा उद्देश असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन म्हणाले.

आज शिक्षण, रेल्वे, पर्यावरण, इंडो-फ्रान्स फोरम, अंतराळ, नौदल, आण्विक, स्मार्ट सिटी, मादक पदार्थांच्या तस्करीचा प्रतिबंध, सौर ऊर्जा, स्थलांतर संपर्क, गोपनीय माहितीची सुरक्षा तसेच सागरविषयक माहितीची देवाणघेवाण अशा अनेक महत्वाच्या करारांवर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या झाल्या.

सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदी महासागरातील चीनचा वाढत प्रभाव लक्षात घेता दोन्ही देश आपल्या नौदल तळाचा परस्परांना वापर करू देणार आहेत आणि त्याबाबत अधिकृत सहमती फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झाली.

हॅशटॅग्स

#Indo France(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x