13 December 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

Voltas Share Price | टाटा कंपनीचा शेअर! घरात गारवा आणि शेअर्समधून मल्टिबॅगर परतावा, गुंतवणूकदारांना करोडपती करतोय

Voltas Share Price

Voltas Share Price | व्होल्टास ही भारतातील एसी आणि फ्रिज बनवणारी सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत बरेच स्वस्त झाले आहेत, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकदारांना कंपनीच्या शेअरने करोडपती केले आहे.

ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटलच्या तज्ञांच्या मते व्होल्टास कंपनीचे शेअर्स पुढील काळात 30 टक्के अधिक वाढू शकतात. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्क्यांघ्या घसरणीसह 807.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 822.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुंतवणुकदार करोडपती झाले

25 जुलै 2003 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 7.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 822 रुपये किमतीवर पोहचला आहे. 20 वर्षापूर्वी या लोकांनी व्होल्टास कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटी रुपये झाले आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1,050.55 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर अवघ्या 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्के खाली आली होती. 27 जानेवारी 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 737.60 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. वार्षिक नीचांकीच्या तुलनेत शेअर आता 9 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

ब्रोकरेज फर्म आयडीबीआय कॅपिटलच्या तज्ञांच्या मते, मागील 28 आठवड्यांपासून व्होल्टास कंपनीच्या शेअरमध्ये कन्सोलिडेशन पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते हे बेस फॉर्मेशनचे प्रारंभिक लक्षण म्हणून ओळखले जाते. याशिवाय व्होल्टास कंपनीच्या शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स उच्च पातळीवर ट्रेड करत आहे. तज्ज्ञांच्या मते स्टॉक पुढील एक ते दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 825 रुपये किंमत ओलांडून 1050 रुपये या लक्ष किमतीकडे मार्गक्रमण करेल.

आयडीबीआय कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी आपल्या संशोधन अहवालात व्होल्टास कंपनीच्या शेअरवर 820-800 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते पुढील 3-4 महिन्यांमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1050 रुपये लक्ष्य किंमत स्पर्श करू शकतात. मात्र गुंतवणूकदारांनी 760 रुपयेवर स्टॉप लॉस लावला पाहिजे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Voltas Share Price today on 22 August 2023

हॅशटॅग्स

#Voltas Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x