
Vedanta Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात घसरणीसह झाली आणि त्यानंतर जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १००० अंकांनी घसरून ८०,३०० च्या पातळीवर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी ३०० अंकांनी घसरला होता. स्टॉक मार्केट बँक निफ्टी जवळपास 700 अंकांनी घसरला होता. शेअर बाजारातील या घडामोडीत वेदांता लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
वेदांता शेअर ‘ओव्हरबॉट’ झोनमध्ये
वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये १ वर्षाचा बीटा १.३ आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो. टेक्निकल चार्टनुसार वेदांता शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) ७४.२ इतका आहे, ज्यामुळे वेदांता लिमिटेड शेअर ‘ओव्हरबॉट’ झोनमध्ये ट्रेड करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
वेदांता शेअर BUY, SELL की HOLD करायचा?
पाच वर्षांत वेदांता लिमिटेड कंपनी शेअर २६२ टक्क्यांनी वधारला आहे. वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा जास्त ट्रेड करत आहेत. 2024 मध्ये वेदांता लिमिटेड कंपनी शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदार वेदांता शेअर BUY, SELL की HOLD करायचा याचा अंदाज बांधत आहेत.
चॉइस ब्रोकिंग फर्म – वेदांता शेअर टार्गेट प्राईस
चॉइस ब्रोकिंग फर्मने वेदांता शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. चॉइस ब्रोकिंग फर्मने वेदांता शेअरसाठी ६०० ते ६२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. चॉइस ब्रोकिंग फर्मचे तज्ज्ञ मंदार भोजने म्हणाले की, ‘दैनंदिन चार्टवर वेदांता शेअरने एक राउंडिंग बॉटम पॅटर्न तयार केला आहे आणि ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये लक्षणीय वाढ झाल्याने हा शेअर ब्रेकआऊटच्या उंबरठ्यावर आहे. साप्ताहिक चार्टवर, वेदांत आयताकृती पॅटर्नमध्ये ट्रेड करीत आहे आणि ब्रेकआऊटसाठी सज्ज असल्याचे संकेत दिसत दिसते. जर वेदांता शेअर प्राईस ५२० रुपयांच्या वर राहिली तर शॉर्ट टर्ममध्ये ती ६०० ते ६२० रुपयांपर्यंत वाढू शकते.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – वेदांता शेअर टार्गेट प्राईस
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी ६६३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘अॅल्युमिनियमच्या किमती वाढल्या असल्या, तरी कॅप्टिव्ह अॅल्युमिनियमचा वाढता वापर, ४०% अॅल्युमिनियम बुईंग स्पॉट बेसिसवर आणि अॅल्युमिनियमच्या भक्कम किमतींमुळे तिसऱ्या तिमाहीत वेदांता कंपनीच्या अॅल्युमिनियम सेगमेंटचा नफा वाढेल. त्यामुळे वेदांता शेअरबाबत आमची सकारात्मक भूमिका कायम आहे असं नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.