1 May 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा
x

Adani Power Share Price | अदानी शेअर्सबाबत मोठी बातमी, शेअर्स पुन्हा सुसाट तेजीत येणार, मागील 3 वर्षांत 957% परतावा दिला

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 2738 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत अदानी पॉवर कंपनीने फक्त 9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.40 टक्क्यांच्या वाढीसह 542.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 544 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील सहा महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीच्या महसूलात 67 टक्के वाढ झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 12991.4 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत अदानी पॉवर कंपनीने 7764.41 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

डिसेंबर 2023 च्या तिमाहीत अदानी पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न 13355 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत अदानी पॉवर कंपनीने 8290 कोटी रुपये उत्पन्न कमावले होते. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत या कंपनीचा EBITDA 151 टक्क्यांच्या वाढीसह 5009.17 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीचा EBITDA 1995.53 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

अदानी पॉवरच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 255.45 रुपये किमतीवर ट्रेड होते. 25 जानेवारी 2024 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 544 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 3 वर्षांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 957 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 जानेवारी 2021 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 51.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 589.30 रुपये होती. तर नीचांक किंमत 132.55 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 27 January 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x