12 December 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Suzlon Share Price | अल्पावधीत 5 पट परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, सध्या 43 रुपयांवर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 पट अधिक परतावा कमावून दिला आहे.

आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी जेव्हापासून कर्जमुक्त झाली आहे, तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी अधिक विश्वास व्यक्त केला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.82 टक्के वाढीसह 43.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच कंपनीला 225 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचा विकास करण्यासाठी एव्हररिन्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी हायब्रिड लॅटिस ट्यूबलरसह 75 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करणार आहे. हा प्रोजेक्ट डब्ल्यूटीजी आणि एचएलटी टॉवर्स तामिळनाडूमधील वेंगाईमंडलम, त्रिची, ओट्टापीदारम, तुतीकोरीन जिल्ह्यात स्थापित केले जाणार आहेत.

या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन कंपनी पवन टर्बाइन उपकरणे पुरवठा करणार आहे. तसेच कंपनी ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासह प्रकल्पाचे निरीक्षण आणि देखरेखीचे काम देखील करणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर सर्वसमावेशक ऑपरेशन आणि देखभाल सेवा संबंधित कामाला सुरुवात करेल.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने आपला ताळेबंद मजबूत करण्यावर अधिक भर दिला आहे. यासह सुझलॉन एनर्जी कंपनीला कर्जमुक्त झाल्याचा जबरदस्त फायदा मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये सध्या 2 GW क्षमतेचे प्रकल्प प्रलंबित आहेत. सुझलॉन एनर्जी ही कंपनी विंड टर्बाइन उत्पादक कंपनी आपले ऑपरेशन्स आणि प्रलंबित ऑर्डर पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

मागील आठवड्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 6.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 37.63 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 296.10 टक्के वाढली आहे.

मागील 3 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 452.38 टक्के वाढवले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.91 टक्क्यांच्या वाढीसह 40.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची वार्षिक नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. तर वार्षिक उच्चांक किंमत पातळी 44.00 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x