12 May 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Vikas Lifecare Share Price | 6 रुपयाचा शेअर खरेदी करणार? मागील 5 दिवसात 32 टक्के परतावा दिला, संयम श्रीमंत बनवेल

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

मात्र आज बाजारात सकारात्मक तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्सच्या यादीत अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक आणि हिरो मोटोकॉर्प या कंपनीचे शेअर्स होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या स्टॉकमध्ये यूपीएल, नेस्ले इंडिया, डिवीज लॅब आणि एसबीआय लाइफ कंपनीचे शेअर्स होते.

शेअर बाजारात प्रचंड नफा वसुली सुरू असताना सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 6.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के घसरणीसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात विकास लाईफकेअर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत विकास लाईफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. 13 जुलै 2023 रोजी विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या नीचांक किमतीच्या तुलनेत शेअरने गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा दिला आहे.

24 मे 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 2.75 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून विकास लाइफकेअर स्टॉक तब्बल 150 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 7 मे 2021 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 2.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरने गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे.

विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 944 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. सेबीला दिलेल्या माहितीत विकास लाइफकेअरकंपनीने कळवले आहे की, कंपनीने व्यवसाय विस्तार करण्यासाठी नवीन जमीन संपादन केली आहे.

विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने आपली उत्पादन क्षमता विस्तार करण्यासाठी आणि पॉलिमर आणि रबर कंपाऊंड्सचा व्यवसाय वाढवण्यासाठी राजस्थान राज्यातील शाहजहानपूर येथील RIICO इंडस्ट्रियल एरियामध्ये 1800 चौरस मीटर जमीन संपादन केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x