12 December 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Container Corporation of India Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने करोडपती केले, बोनस शेअर्सने केला चमत्कार, स्टॉक डिटेल्स

Container Corporation of India Share Price

Container Corporation of India Share Price | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दीर्घकाळ गुंतवणूक होल्ड केल्यास बोनस, लाभांश, स्टॉक्स स्प्लिट, बाय बॅक, यांसारखे सर्व बेनिफिट मिळतात. आज या लेखात आपण अशा एका सरकारी कंपनीच्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या शेअर धारकांना 4 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एक लाखाच्या गुंतवणुकीवर एक कोटी पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Container Corporation of India Share Price | Container Corporation of India Stock Price | BSE 531344 | NSE CONCOR)

गुंतवणूकदार झाले करोडपती :
कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत मागील वीस वर्षात 25 रुपये वरून 635 रुपये वर गेली आहे. याचा अर्थ या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात 2450% परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी वीस वर्षांपूर्वी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते सध्या त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढवून 25.50 लाख रुपये झाले आहे. या दरम्यानच्या काळात कंपनीने आपल्या शेअर धारकांना चार वेळा बोनस शेअर वाटप केले होते. जर सर्व शेअरची संख्या मोजून परताव्याची गणना केली तर गुंतवणूकदारांनी मागील वीस वर्षात एक लाख रुपयावर 1.19 कोटी रुपये परतावा कमावला आहे.

बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स एप्रिल 2008, सप्टेंबर 2013, एप्रिल 2017, आणि फेब्रुवारी 2019 मध्ये एक्स-बोनसवर ट्रेड करत होते. 2008 साली कंपनीने 1 : 1 प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. सप्टेंबर 2013 मध्ये 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. एप्रिल 2017 आणि 2019 मध्ये कंपनीने 1 : 4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

बोनसचा गुंतवणुकीवर परिणाम :
वीस वर्षांपूर्वी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स फक्त 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जा गुंतवणूकदाराने त्यावेळी एक लाख रुपये गुंतवले होते तेव्हा त्यांना चार हजार शेअर्स मिळाले. 2008 मध्ये बोनस शेअर्स जारी केल्यानंतर शेअरची संख्या 8000 झाली. 2013 मध्ये 1 : 2 बोनस शेअर्स जारी केल्यावर शेअरची संख्या 12,000 शेअर्स झाली. एप्रिल 2017 मध्ये 1 : 4 प्रमाणात बोनस जारी केल्यावर शेअरची संख्या 15000 झाली. शेवटच्या वेळी बोनस दिल्यानंतर गुंतवणूकदाराकडे शेअर्सची संख्या 18,750 झाली होती. सध्याच्या 632.32 रुपये किमतीनुसार या शेअरचे आजचे मूल्य 1.18 कोटी रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Container Corporation of India Share Price 531344 CONCOR stock market live on 31 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x