Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
Highlights:
- Suzlon Share Price – NSE: Suzlon – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
- 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
- 5 वर्षात 3500% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच पवन ऊर्जा कंपनी सुझलॉन एनर्जीला (NSE: Suzlon) बीएसई आणि एनएसई या स्टॉक एक्स्चेंजने चेतावणी दिली आहे. या कंपनीला स्टॉक एक्स्चेंजने सेबीच्या प्रकटीकरण नियमांची वेळेवर पूर्तता न केल्यामुळे चेतावणी दिली आहे. या कंपनीला अशाप्रकारे नोटीस दिल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील जुलै 2024 मध्ये NSE ने सुझलॉन एनर्जी कंपनीला प्रकटीकरण नियमांचे पालन न केल्याने नोटीस दिली होती. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
सोमवारी या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात 79.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.30 टक्के घसरणीसह 77.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे माजी स्वतंत्र संचालक मार्क डेसडेलर्स यांच्या राजीनाम्याशी संबंधित खुलासे न केल्याने सुझलॉन एनर्जी कंपनीला सेबीकडून हा चेतावणीपूर्वक इशारा देण्यात आला आहे. याशिवाय NSE आणि BSE ने सुझलॉन एनर्जी कंपनीला अधिक सावधगिरी बाळगण्याचा आणि भविष्यातील प्रकटीकरणांमध्ये अनुपालन नियम सुनिश्चित करण्याचा इशारा दिला होता.
यापुढे कोणतीही चूक झाल्यास कंपनीला कठोर कारवाईची देखील सूचना देण्यात आली होती. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना आश्वासन दिले होते की या समस्यांमुळे कंपनीच्या आर्थिक किंवा ऑपरेशनल क्रियाकलापांवर कोणताही परिणाम होणार नाही.
5 वर्षात 3500% परतावा दिला
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 110 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 194 टक्के आणि पाच वर्षात 3500 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील पाच वर्षात या कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 86.04 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.74 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,08,789.94 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price 03 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News