6 May 2024 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
x

PI Industries Share Price | 1 दिवसात शेअर 10 टक्के वाढला, एका सकारात्मक बातमीमुळे शेअरची किंमत गगनात, स्टॉक परफॉर्मन्स तपासा

PI Industries Share Price

PI Industries Share Price | शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी ‘पीआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअरने एका दिवसात 10 टक्के वाढीसह 3371 रुपये किंमत स्पर्श केली होती. इंट्रा डे ट्रेडमध्ये शेअरची किंमत 3412 रुपये प्रति शेअर किमतीवर पोहोचलो होती. पीआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी दोन मोठ्या कंपन्यांच्या अधिग्रहणमुळे झाली आहे. (PI Industries Limited)

पीआय इंडस्ट्रीज स्टॉकवाढीचे कारण :
सेबीला दिलेल्या माहितीमध्ये PI इंडस्ट्रीज कंपनीने म्हंटले आहे की, Therachem Research Medilab आणि Archimica SpA या दोन कंपन्याचे अधिग्रहण PI इंडस्ट्रीजने पूर्ण केले आहे. या संपादनामुळे PI इंडस्ट्रीज कंपनीचे सक्रिय फार्मास्युटिकल घटक आणि कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन स्पेस होल्डिंगमधील मार्केट शेअर वाढणार आहे.

‘पीआय इंडस्ट्रीज’ कंपनीची उपकंपनी ‘पीआय हेल्ड सायन्सेस’ ने ‘थैराकेम रिसर्च मेडिलॅब इंडिया’ कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय कंपनीची यूएस मालमत्ता देखील या खरेदीमध्ये सामील आहे. PI ग्रुपने या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी 550 दशलक्ष डॉलर्स खर्च केले. अधिक 2.5 दशलक्ष डॉलर्स पुढील 6 वर्षांमध्ये खर्च केले जाणार आहे.

PI ग्रुपने आणखी एक कंपनी ‘Archimica SpA’ ची देखील खरेदी केली आहे. त्याच्या 100 टक्के हिस्सेदारीसाठी PI ग्रुपने 34.2 दशलक्ष युरो खर्च केले आहेत. दोन्ही कंपन्याच्या अधिग्रहणामुळे PI इंडस्ट्रीज कंपनीला API आणि CDMO व्यवसायात जास्त ताकद प्राप्त होणार आहे. मागील एका वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PI Industries Share Price Today on 29 April 2023.

हॅशटॅग्स

PI Industries share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x