14 December 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Penny Stocks | फक्त 7 रुपायाचा शेअर! हा पेनी स्टॉक करेल मालामाल, फ्री बोनस शेअर्स जाहीर होण्याची शक्यता

Penny Stocks

Penny Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर तुम्ही इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावू शकता. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

22 नोव्हेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 2.74 टक्क्यांच्या घसरणीवसह 7.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.10 टक्के घसरणीसह 7.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 27 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करू शकतात. 17 नोव्हेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीने घोषणा केली होती की, तिच्या Agro व्यवसायाला भारतातील अग्रगण्य कंपनी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड आणि तिची साहित्य उपकंपनी असलेल्या हिमालयन बायो ऑर्गन फूड्स लिमिटेड कंपनीकडून 150 दशलक्ष रुपये आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आले आहेत.

इंटेग्रा एसेंशिया कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 17.11 टक्के वाढीसह 6689.71 लाख रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5712.55 लाख रुपये महसूल संकलित केेला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इंटेग्रा एसेंशिया कंपनीने 248.71 टक्के वाढीसह 752.79 लाख रुपये PAT नोंदवला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 215.88 लाख रुपये PAT नोंदवला होता. कंपनीचे PAT मार्जिन या तिमाहीत वाढून 10.07 टक्केवर पोहचले आहेत. तर मागील वर्षी ते 3.63 टक्के होते. कंपनीचा EBITDA मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत 211.11 लाख रुपये होता, जो या तिमाहीत 420.98 टक्के वाढीसह 1099.84 लाख रुपयेवर पोहचला आहे.

मागील एका महिन्यात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे . मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 12 टक्के घसरले आहेत.

मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 460 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1805 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Integra Essentia Share Price 24 November 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x